मी रोज 45 मिनिटं चालतो. मग दिवसभर बसलो तरी काही हरकत नाही ना?
OPD मध्ये हा प्रश्न वारंवार ऐकायला मिळतो.
मी म्हणतो…
“रोज 45 मिनिटं चालणं चांगलं आहे… पण उरलेल्या दिवसभरात काय करता, हे जास्त महत्त्वाचं आहे.”
म्हणून मी त्यांना एक साधा नियम सांगतो…
सलग 60 मिनिटांपेक्षा जास्त बसू नका.
1. व्यायाम (Exercise) आणि हालचाल (Movement) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
सकाळचा व्यायाम हा दिवसातील एक भाग आहे.
पण उरलेल्या १२–१४ तासांत तुम्ही शरीराला किती वेळा हालचाल दिली, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.
2. सलग बसल्यावर शरीरात काय बदल होतो?
पायांचे मोठे स्नायू (Large Skeletal Muscles) हे रक्तातील साखर (Blood Sugar) वापरणारे शरीरातील सर्वात सक्रिय भागांपैकी एक आहेत.
दीर्घकाळ ते निष्क्रिय राहिले, तर शरीराची चयापचय प्रक्रिया (Metabolism) आणि इन्सुलिनची (Insulin) कार्यक्षमता यावर परिणाम होऊ शकतो.
3. संशोधन (Research) काय सांगतं?
दीर्घकाळ सलग बसणं हे स्वतंत्र आरोग्य जोखीम (Independent Health Risk) मानलं जातं.
म्हणूनच…
“मी व्यायाम करतो” आणि “मी दिवसभर सक्रिय असतो” या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
4. हा नियम सर्वांसाठीच , विशेषतः
✔ मधुमेह (Diabetes)
✔ प्रीडायबिटीज (Prediabetes)
✔ इन्सुलिन रेसिस्टन्स (Insulin Resistance)
✔ Fatty Liver
✔ लठ्ठपणा (Obesity)
✔ ऑफिसमध्ये किंवा प्रवासात दीर्घकाळ बसून काम करणारे
5. एक साधा नियम…
प्रत्येक 30–60 मिनिटांनी किमान 2–3 मिनिटं उभं राहा.
फोनवर बोलताना थोडं चाला.
पाणी स्वतः घेऊन या.
दोन मिनिटं स्ट्रेचिंग करा.
व्यायाम हा दिवसातील एक कार्यक्रम आहे…
हालचाल (Movement) ही जीवनशैली आहे.
आरोग्याला दोन्हींची गरज असते.
📌 आजची छोटी कृती
आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा…
“आज मी सलग किती वेळ बसलो होतो?”
उत्तर अचूक असण्याची गरज नाही.
हा प्रश्न रोज पडू लागला… तर बदल सुरू झाला असं समजा.
📱 आपलं App लवकरच येत आहे हृदय, BP, Diabetes आणि दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापन अधिक सोपं आणि सातत्यपूर्ण बनवण्यासाठी.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
#MetabolicHealth #MoveMore #HealthyHabits #JustForHearts