इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री, महाराष्ट्र राज्य.

Joined August 2018
11,757 Photos and videos
Pinned Post
आपण भरभरून मतदान करून भगव्याची शान राखली.. आता छत्रपती संभाजीनगर नावाला शोभेल असा विकास घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! #भाजपाचे_छत्रपती_संभाजीनगर
3
1
22
4,425
पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि सार्वजनिक जीवनात अनेक दशकांपासून दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत यंदा प्रथमच प्रदान करण्यात येणारा 'डॉ.शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार' मा.श्री.राजेंद्रबाबू दर्डा यांना जाहीर झाला आहे.. या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #जीवनगौरव #पुरस्कार #award #congratulation
1
85
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त कैलास नगर संपर्क कार्यालय येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.. राष्ट्रीय एकात्मतेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे विचार आजही प्रेरणादायी ठरतात.. #श्यामाप्रसाद_मुखर्जी #जयंती #अतुल_सावे #Chhatrapati_Sambhaji_Nagar
1
39
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! देशात हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाला त्यांनी प्रोत्साहित केले. राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहून ‘एका देशात दोन कायदे चालणार नाहीत’ अशी गर्जना त्यांनी केली व काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी त्याग केला. त्यांच्या या कार्याला सत्यात उतरवत भाजपा सरकारने काश्मीरमधून कलम ३७० हद्दपार केले आणि ‘एक राष्ट्र, एक ध्वज’ ही परंपरा कायम ठेवली. #श्यामाप्रसाद_मुखर्जी #जयंती #ShyamaPrasadMukherjee #Jayanti
1
3
103
भारतीय जनसंघाचे संस्थापक, थोर विचारवंत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त बजरंग चौक संपर्क कार्यालय येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.. राष्ट्रीय एकात्मतेसाठी तुरुंगवास भोगत प्राणार्पण करणाऱ्या डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे धाडस व देशनिष्ठा भारतीय राजकारणाच्या इतिहासात अजरामर आहे.. #श्यामाप्रसाद_मुखर्जी #जयंती #Chhatrapati_Sambhaji_Nagar
3
114
भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी नेते डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी लिहिलेला लेख नक्की वाचा!! #श्यामाप्रसाद_मुखर्जी #ShyamaPrasadMukherjee
1
2
74
छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आमदार श्री.सतीश चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. या निवडणुकीत लाभलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. #छत्रपती_संभाजीनगर #जिल्हा_सहकारी_बँक #Satish_Chavan
2
14
425
विजयाचा झंझावात... छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महायुती विकास पॅनलचा ऐतिहासिक विजय! #जिल्हा_बँक #निवडणूक_विजय #DCC_Bank
1
7
222
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महामहिम राज्यपाल श्री.हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करत शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी हे संचालक मंडळ प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. #जिल्हा_बँक #निवडणूक #हरिभाऊ_बागडे #छत्रपती_संभाजीनगर #Cooperation #ChhatrapatiSambhajinagar
2
22
999
छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील विजयाचा आनंद सर्वप्रथम आईच्या चरणी अर्पण करत तिचा आशीर्वाद घेतला. आईचा आशीर्वाद ही माझ्या प्रत्येक यशामागची खरी प्रेरणा आणि पुढील वाटचालीची नवी ऊर्जा आहे.. #छत्रपती_संभाजीनगर #जिल्हा_सहकारी_बँक #विजय #आईचा_आशीर्वाद #Cooperation
1
22
1,907
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर संस्थान गणपती मंदिर येथे श्रींचा आशीर्वाद घेतला. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, पुढील काळातही सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी व सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य बळ मिळो अशी प्रार्थना केली. #संस्थान_गणपती #जिल्हा_बँक_निवडणूक_विजय #छत्रपती_संभाजीनगर #Chhatrapati_Sambhaji nagar
9
201
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या दणदणीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. जिल्हा सहकारी बँकेपासून क्रांती चौकापर्यंत विजय रॅली काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी मिळालेला हा कौल अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. सहकाराच्या माध्यमातून विकासाची ही वाटचाल अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.. #छत्रपती_संभाजीनगर #जिल्हा_सहकारी_बँक #शेतकरी_विकास_पॅनल #विजय_रॅली #Chhatrapati_Sambhajinagar #Cooperative_Bank
2
8
273
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील विजयानंतर सर्व सहकाऱ्यांसोबत हा आनंदाचा क्षण साजरा केला. सर्वांच्या सहकार्याने, एकजुटीने शेतकरी, सभासद आणि सहकार चळवळीच्या हितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. #जिल्हा_बँक #विजय_उत्सव #DCC_Bank #Chhatrapati_Sambhajinagar
1
11
297
विजयानंतर पहिली प्रतिक्रिया.. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रगतीसाठी आणि त्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.. #जिल्हा_बँक #निवडणूक_विजय #DCC_bank #Chhatrapati_Sambhajinagar
1
4
10
562
सहकारातून समृद्धीकडे.. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी सभासदांनी दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण क्षमतेने पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहोत. बँकेची प्रगती, पारदर्शक कारभार, आणि सभासदांचे हित साधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असेल.. या निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार.. सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन... #जिल्हा_बँक #निवडणूक_विजय #DCC_bank #Chhatrapati_Sambhajinagar
1
2
164
छत्रपती संभाजीनगर येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय युवा बास्केटबॉल स्पर्धेला भेट देऊन विविध जिल्ह्यांतून सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यातील ३६ मुलांचे आणि ३१ मुलींचे जिल्हा संघ, तसेच ८०४ खेळाडू आणि २४० अधिकारी सहभागी झाल्यामुळे ही स्पर्धा राज्यातील युवा क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरत आहे. अशा स्पर्धांमुळे खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते, स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळते. #मुख्यमंत्री_चषक #Basketball #YouthSports #ChhatrapatiSambhajinagar #KheloMaharashtra #SportsDevelopment
1
5
169
दिव्यांग विवाह प्रोत्साहन अनुदान वितरणासाठी तातडीने मोहीम राबविण्याचे राज्य सरकारचे आदेश! राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे तातडीने वितरण करण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभागाने घेतला आहे. या योजनेंतर्गत आता दिव्यांग-अव्यांग विवाहासाठी रु.१,५०,०००/- आणि दिव्यांग-दिव्यांग विवाहासाठी रु.२,५०,०००/- इतके अनुदान दिले जाणार आहे. विशेष म्हणजे दिव्यांग-दिव्यांग हा घटक योजनेत नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला प्राप्त झालेल्या अर्जांवर दिनांक २१ जुलै २०२६ पर्यंत निर्णय घ्यावा आणि पात्र लाभार्थ्यांना ३१ जुलै २०२६ पर्यंत निधी वितरित करावा, असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित सदस्य सचिव तसेच सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमात प्रतीकात्मक स्वरूपात पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ प्रदान करण्यात येणार आहे.. दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध आहे.. #दिव्यांग_सक्षमीकरण #महाराष्ट्र_शासन #Maharashtra
1
2
9
240