🏆 खेळाडूंचा सन्मान म्हणजे जिद्द, मेहनत आणि यशाचा गौरव! 🇮🇳💐
📍 पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, पुणे
🗓️ सोमवार, ०६ जुलै २०२६
पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित श्री. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांच्या सत्कार समारंभात उपस्थित राहून गुणवंत खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना माझ्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्याचा मान लाभला.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंच्या यशामागील कठोर परिश्रम, शिस्त, चिकाटी आणि समर्पणाला मानवंदना देण्याचा हा प्रेरणादायी क्षण होता. प्रत्येक पुरस्कार हा केवळ एका खेळाडूचा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेचा सन्मान आहे.
यावेळी मा. श्री. नारायण मोहन गलांडे (क्रीडा समिती अध्यक्ष), मा. श्री. श्रीनाथ भिमाले (स्थायी समिती अध्यक्ष), मा. श्री. निलेश निकम (विरोधी पक्षनेते), मा. डॉ. श्री. संतोष टेंगळे (उपायुक्त – क्रीडा) तसेच विविध मान्यवर, क्रीडापटू, प्रशिक्षक, अधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व पुरस्कार विजेते खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या यशाची ही परंपरा अशीच अखंड सुरू राहो आणि महाराष्ट्राचा तिरंगा जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये अधिक उंच फडकत राहो, हीच शुभेच्छा. 🏅
#Sports #ShivChhatrapati #SportsAwards #Pune #Maharashtra #Athletes #SportsSpirit
🌷🚩🚩🚩🌷
|| जय श्रीराम ||
आपले रामदूत
सौ. मंजुषा दीपक नागपुरे
महापौर, पुणे
#ManjushaNagpure #Mayorofpune
@BhimaleShrinath
@AdvNileshNikam
@NarayanGalande
2
163







































