तुम्हाला हे माहिती आहे का?
२०१९ मध्ये पुणे कमिशनर यांच्याकडे एक तक्रार दाखल झाली होती. विषय होता...काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी लोकांसाठी पूरक भूमिका घेऊन त्यांच्यासाठी सोशल मीडियावर काही पोस्ट प्रसारित केल्या जात होत्या. ती व्यक्ती कोण होती, माहिती आहे का? तोच अभिजीत दीपके, जो तेव्हा 'आम आदमी पक्षा'चा सोशल मीडिया हेड होता आणि आज 'कॉक्रोज जनता पार्टी' नावाने सोशल मीडिया अकाउंट हँडल करत आहे.
२०१९ मध्ये केलेल्या तक्रारीनंतर, त्याने त्या देशविरोधी पोस्ट डिलीट केल्या आणि आपला बायो देखील बदलला. आज हा तथाकथित तरुण विदेशात बसून सोशल मीडियावर तरुणांचे एक संघटन करू पाहत आहे. विदेशात बसून आपल्या तरुणांची माथी भडकवण्याचे काम हा नक्कीच करणार. अशांतता पसरवणे हाच यांचा मुख्य हेतू २०१९ मध्ये होता आणि आजही तोच आहे. फरक फक्त एवढाच की, तेव्हा तो स्वतः करत होता आणि आता याने भारतातील तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे.
मात्र, याबाबतीत भारतीय तरुण नक्कीच यापेक्षा अधिक प्रगल्भ आहे. आपला आदर्श कोणी 'तीनपाट झुरळ' नसून अर्चित पाटील आहे, ज्याने अवघ्या १७ व्या वर्षी Postpartum Haemorrhage Cup नावाचे वैद्यकीय उपकरण शोधले. आपला आदर्श Youth Co: Lab मधील हजारो तरुण आहेत. आपला आदर्श Space Tech & Civilian Drone Operations करणारे दिल्लीचे ते हजारो तरुण आहेत. अशी अनेक Gen Z तरुण आहेत जे विकसित भारताच्या संकल्पनेसाठी आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत.
काही चुकले असेल तर नक्कीच आवाज उठवा, आंदोलन करा, टीका करा, प्रशासनाला व सरकारला आपला मुद्दा पटवून द्या; मात्र अट एकच हे सर्व आपण संविधानिक मार्गाने करू. अराजक आणि देशविरोधी कारस्थानाला बळी पडून आपला उमेदीचा काळ स्वतःला
#ProudCockroach म्हणून घेण्यात घालवू नका. आपले आणि आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या आपल्या देशात आहे. म्हणून आपल्याला आपल्या ध्येयावरून बाजूला घेऊन जाण्यासाठी अनेक असे 'कॉक्रोच' येतील, त्यांना पायदळी तुडवत आपले आदर्श कोण, याची आठवण करत जा.
2019 मधील तक्रार:
facebook.com/share/197aYz6Zz…
देशविरोधी डिलिट केलेली पोस्ट:
x.com/i/status/1158648665684…